Rahul Gandhi On Delhi Election Results: 'लढाई सुरूच राहील'; दिल्ली निवडणूक निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया
आम्ही दिल्लीचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि सर्व मतदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई - दिल्लीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठी सुरूच राहील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi On Delhi Election Results: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला असून 27 वर्षांनी भाजप दिल्लीत पुन्हा सत्तेत आले आहे. त्याच वेळी आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा दिल्लीत खाते उघडता आले नाही. आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे दिल्ली निवडणूक निकाल आणि काँग्रेसच्या कामगिरीवर विधान समोर आले आहे.
'लढाई सुरूच राहील' - राहुल गांधी
आम्ही दिल्लीचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि सर्व मतदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई - दिल्लीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठी सुरूच राहील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांची एक्स पोस्ट -