The Dharavi Model: जागतिक स्तरावर कौतुक झालेले 'धारावी मॉडेल' पुस्तकरूपाने उपलब्ध; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले प्रकाशन

The Dharavi Model: जागतिक स्तरावर कौतुक झालेले 'धारावी मॉडेल' पुस्तकरूपाने उपलब्ध

The Dharavi Model Book (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले आहे. या यशस्वी प्रयत्नांतील अनुभव, साद्यंत माहितीचा आढावा घेणाऱ्या ‘दी धारावी मॉडेल’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, पर्यावरण व  राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या पुस्तकाचे लेखक  किरण दिघावकर हे मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या या प्रकाशन प्रसंगी लेखक श्री. दिघावकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे आय़ुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now