Telangana Assembly Election Results 2023: तेलंगानात BRS ने स्विकारला पराभव, काँग्रेसला दिल्या विजयाच्या शुभेच्छा

बीआरएसनेही आपला पराभव मान्य केला आहे. केसीआर सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येतील अशी अपेक्षा होती.

तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू असून ट्रेंडमध्ये काँग्रेसने बीआरएसवर मोठी आघाडी मिळाली आहे. बीआरएसनेही आपला पराभव मान्य केला आहे. केसीआर सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येतील अशी अपेक्षा होती. केसीआरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टमध्ये लिहिले की, 'बीआरएस सरकारला सलग दोन टर्म दिल्याबद्दल मी तेलंगणातील जनतेचा आभारी आहे. आजच्या निकालाने दु:खी नाही, पण आपल्या अपेक्षेप्रमाणे न झाल्याने नक्कीच निराश झालो. पण आम्ही ते धडा म्हणून घेऊ आणि परत बाउन्स करू. जनादेश जिंकल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदन. आपणास शुभेच्छा.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)