Taj Hotel Receives Bomb Threat: लखनऊच्या ताज हॉटेलला बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी ईमेलद्वारे देण्यात आली. यापूर्वी रविवार 27 ऑक्टोबर रोजी इतर हॉटेलांनाही अशाच धमक्या मिळाल्या होत्या. तपासाअंती त्या हॉटेल्समधील बॉम्बच्या धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. हा धोका गांभीर्याने घेत हॉटेलच्या सभोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे देखील वाचा: X Suspends Khamenei's Hebrew Account: इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचे हिब्रू खाते एक्स द्वारे निलंबीत; जाणून घ्या कारण
लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी