Suspicious Electronic Device Found In Delhi: दिल्लीच्या पालिका बाजारात सापडले संशयास्पद इलेक्ट्रॉनिक उपकरण; चौकशी सुरू

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या उपकरणाची पडताळणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क जॅमर विकणे बेकायदेशीर आहे.

Delhi police | Twitter

Suspicious Electronic Device Found In Delhi: देशाची राजधानी दिल्लीत एका दुकानात संशयास्पद इलेक्ट्रॉनिक उपकरण सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयास्पद यंत्र ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली पोलिसांनी पालिका बाजारातील पडताळणीदरम्यान एका दुकानातून एक संशयास्पद इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केले आहे. हे संशयास्पद इलेक्ट्रॉनिक उपकरण मोबाईल नेटवर्क जॅमरप्रमाणे काम करत आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या उपकरणाची पडताळणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क जॅमर विकणे बेकायदेशीर आहे. सध्या यंत्राची पडताळणी केल्यानंतर दुकानदारावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

दिल्लीच्या पालिका बाजारात सापडले संशयास्पद इलेक्ट्रॉनिक उपकरण -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now