Delhi Riots: उमर खालिदच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात 24 जुलैला होणार सुनावणी

सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी खालिदच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला.

Supreme Court

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयचा (JNU) चा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद याला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या जातीय दंगलीमागील व्यापक कटाशी संबंधित UAPA प्रकरणात खालिदने जामीन मागितला आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी खालिदच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. यानंतर सुप्रीम कोर्टाने 24 जुलैला सुनावणी पुढे ढकलली.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement