Suicide Caught on Camera in Hyderabad: चालत्या बस समोर उडी घेत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर
या व्यक्तीने कोणत्या कारणातून आपले जीवन संपवले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
हैदराबादमध्ये गचीबोवली येथे एका व्यक्तीने चालत्या आरटीसी बसच्या मागच्या चाकाखाली येऊन आपले जीवन संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीत काम करणारा मूळचा पश्चिम बंगालचा राहणारा बिसू रजब (40) सायंकाळी कोंडापूर चौकात आला असता अचानक चालत्या आरटीसी बसखाली आला. बस त्याच्या अंगावर गेली आणि तो जखमी झाला. हे पाहून स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या व्यक्तीने कोणत्या कारणातून आपले जीवन संपवले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)