VL SRSAM Missile Successfully Test: ओडिशाच्या किनाऱ्यावर व्हीएल एसआरएसएएम या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी (Watch Video)
ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) वरून वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस-टू-एअर मिसाईल (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्र प्रणालीने लक्ष्याचा यशस्वीपणे मागोवा घेतला.
VL SRSAM Missile Successfully Test: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) वरून वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस-टू-एअर मिसाईल (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्र प्रणालीने लक्ष्याचा यशस्वीपणे मागोवा घेतला. या चाचणीचे उद्दिष्ट प्रॉक्सिमिटी फ्यूज आणि सीकरसह शस्त्र प्रणालीच्या अनेक अद्ययावत घटकांचे प्रमाणीकरण करणे आहे. ITR चांदीपूर येथे तैनात केलेल्या रडार इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि टेलीमेट्री यांसारख्या विविध उपकरणांद्वारे प्रणालीच्या कार्यप्रदर्शनाचा बारकाईने मागोवा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, DRDO आणि भारतीय नौदलाच्या संघांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले.
VL SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)