INS Vikrant वरून नौदलाच्या MiG 29K लढाऊ विमानाचे यशस्वी उड्डाण व लँडिंग (Watch Video)

भारतातील पहिली मेड इन इंडिया विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2022 रोजी कोची शिपयार्ड येथे नौदलात सामील करण्यात आली.

INS Vikrant

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने भारतीय नौदलाने एक मोठी कामगिरी केली आहे. सोमवारी नौदलाच्या वैमानिकांनी मेड इन इंडिया आयएनएस विक्रांतवर दोन लढाऊ विमानांचे पहिले यशस्वी लँडिंग केले. नौदलाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, त्यांनी हलके लढाऊ विमान आणि मिग-29 के ने यशस्वीपणे उड्डाण केले आणि उतरवले. भारतातील पहिली मेड इन इंडिया विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2022 रोजी कोची शिपयार्ड येथे नौदलात सामील करण्यात आली. यासह, भारत 40,000 टन पेक्षा जास्त श्रेणीची विमानवाहू जहाजे तयार करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)