Subramanian Swamy on CEC: उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजप खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांचा पाठिंबा

भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा अहेर दिला असून यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची मुख्य निवडणूक आयूक्तांना हटवण्याची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे.

subramanian swamy

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ सुरु असून निवडणूक आयोगाने (Election Commission) उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आता भाजप खासदार सुब्रम्हण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी देखील पाठिंबा दिला आहे. स्वामी म्हणाले आहे की "मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला माझा पाठिंबा आहे कारण त्यांचा कार्यकाळ अर्थमंत्रालयात संशयास्पद होता."

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement