Street Dogs Attack on Toddler: हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

रस्त्यावर खेळणाऱ्या एका चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

Hyderabad Street dog

हैदराबादमध्ये (Hyderabad) भटक्या कुत्र्यांची (Street Dogs) दहशत पाहायला मिळत आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. (Street Dogs Attack) कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा मुलाने प्रयत्न केला पण तो स्वत:चे प्राण वाचवु शकला नाही. चिमुरड्याची 6 वर्षीय बहिणींने कृत्र्याच्या हल्ल्याची माहिती वडिलांना दिली. मुलाचे वडील गंगाधर यांनी जखमी मुलाला घेऊन खासगी रुग्णालयात पोहोचले, तेथे डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात आणण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)