Cow Attack Caught on Camera in Haryana: कुरुक्षेत्र येथे भटक्या गाईचा 65 वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला; घटनेत जागीच महिलेचा मृत्य (Watch Video)

हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे भटक्या गाईच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. वृद्धा अंगणात साफसफाई करत असताना गाईने तिच्यावर हल्ला केला.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Cow Attack Caught on Camera in Haryana: हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे भटक्या गाईच्या(Stray Cattle Attcak) हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. वृद्ध महिला अंगणात साफसफाई करत असताना गाईने तिच्यावर अचानक हल्ला केला. गुरप्रीत कौर असे मृत महिलेचे नाव (Old Woman Died)असून ही घटना शनिवार, 28 जुलै रोजी कुरुक्षेत्रमधील पटेल नगरमध्ये घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. गायीने हल्ला करताच कौर जमिनीवर पडल्या. मात्र, त्यानंतरही गाईचा त्यांच्यावर हल्ला सुरूच होता. घटनेची दृश्य व्हाडीओत दिसत आहेत. कौर यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी गाईला हकलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा: Uttar Pradesh: अलिगड येथे शाळेत शिक्षिकेचा कारनामा! चटई अंथरूण झोपली, चिमुकल्यांकडून हातातील पंख्याने हावा (Watch Video))

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now