Sleeping Thief in Mathura Railway Station: मथूरा रेल्वे स्टेशनवर झोपेचे सोंग घेऊन चोरत होता मौल्यवान वस्तू; व्हिडीओ समोर येताच पोलिसही झाले थक्क ( Watch Video )

मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.

Photo Credit- x

Sleeping Thief in Mathura Railway Station: रेल्वे प्रवासादरम्यान अनेकांचे फोन, मौल्यवान वस्तू आणि पाकिटं चोरीला गेल्याच्या तक्रारी आपण पाहिल्या असतील. मथूरा रेल्वे स्टेशन (Mathura station) वर अशाच एक चोराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. स्थानकातील पॅसेंजर वेटिंग रुममध्ये असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फूटेजच्या माध्यामातून त्याला पोलिसांनी पकडलं आहे.वेटिंग रुममध्ये काही प्रवासी जमिनीवरच झोपलेले असताना तो त्या व्यक्तींच्या बाजूला जाऊन झोपायचा आणि त्यांच्या खिशातील वस्तू चोरायचा. झोपेचं सोंग आणून चोरी करणाऱ्या या चोराने लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. रेल्वे पोलिसांनी या चोराला अटक केली आहे. अवनिश सिंह असं त्याचं नाव असून तो 21 वर्षांचा आहे. तो इथा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. आतापर्यंत त्याने अशाप्रकारे 5 मोबाईल चोरल्याची कबुली चोराने दिली आहे. (हेही वाचा :B Tech Laptop Thief in Bengaluru: बेंगलूरू मध्ये पीजी मधून लॅपटॉप्स चोरणारी 29 वर्षीय बीटेक तरूणी अटकेत )