Hyderabad Road Accident: ज्युबली हिल्स येथे ट्रॅफिक पोलिस चौकीला भरधाव बीएमडब्ल्यूची धडक, चालक घटनास्थळावरून पसार (Watch Video)
हैदराबादमधील ज्युबली हिल्स चेकपोस्टवरील ट्रॅफिक पोलिस चौकीवर एका वेगावान बीएमडब्ल्यूने धडक दिली. चालक दारू पिऊन कार चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Hyderabad Road Accident: शनिवारी पहाटे ज्युबली हिल्स (Jubilee Hills) चेकपोस्टवरील ट्रॅफिक पोलिस चौकीवर एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने (BMW Car) धडक दिली. ज्यामुळे पोलिस चौकीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, बीएमडब्ल्यूचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे कारचे एक टायर देखील फुटले. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की अपघाताच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातानंतर, चालक बीएमडब्ल्यू सोडून घटनास्थळावरून पळून गेला. ज्युबली हिल्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेय फरार चालकाचा शोध सुरू आहे. अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि अपघाताची नेमकी परिस्थिती निश्चित करण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत.
ज्युबली हिल्स येथे ट्रॅफिक पोलिस चौकीला भरधाव बीएमडब्ल्यूची धडक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)