Snake Video: व्यक्तीने घरात घुसलेल्या सापाला पकडून GHMC वॉर्ड कार्यालयात सोडले; अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीला कंटाळून उचलले पाऊल (Watch)

बुधवारी सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, साप टेबलावर दिसत आहे आणि दुसरीकडे ही व्यक्ती अधिकाऱ्यांशी वाद घालत आहे.

कार्यालयात साप सोडला

हैद्राबादमधील एका व्यक्तीने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) वॉर्ड ऑफिसमध्ये कथितपणे साप सोडल्याची घटना समोर आली आहे. ही व्यक्ती त्याच्या तक्रारीचे निराकरण करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीबद्दल संतप्त होती, त्यातूनच हे कृत्य घडल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, हा साप त्या व्यक्तीच्या घरात घुसला होता, ज्याला त्याने स्वतः पकडून मंगळवारी अलवल येथील जीएचएमसी वॉर्ड ऑफिसमध्ये सोडले होते. बुधवारी सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, साप टेबलावर दिसत आहे आणि दुसरीकडे ही व्यक्ती अधिकाऱ्यांशी वाद घालत आहे. त्याच्या तक्रारीवर तोडगा न निघाल्याने तो संतापला होता. या प्रकरणी जीएचएमसीच्या अधिका-यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (हेही वाचा: Cobra Snake Inside Man's Shirt: झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टमध्ये शिरला भलामोठा साप, जाणून घ्या काय घडले पुढे)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement