प्रख्यात वादक Sivamani यांनी Kochi Airport वर सामानाची वाट बघत ताटकळणार्यांना दिली लाईव्ह 'Humma-Humma' ची ट्रीट (Watch Video)
64 वर्षीय शिवमणी यांनी तेथेच 'हम्मा हम्मा' गाण्यावर ताल धरत उपस्थितांची मनं जिंकली.
प्रख्यात भारतीय वादक शिवमणी यांनी उत्स्फूर्तपणे कोची विमानतळावरील प्रवाशांना अनपेक्षित संगीताच्या मेजवानी दिली. प्रवासी त्यांच्या सामानाची वाट पाहत असताना बुधवारी ही घटना घडली. 40 मिनिटे उलटून गेली होती, परंतु त्यांच्या सामानाचे कोणतेही चिन्ह नव्हते. तेव्हा 64 वर्षीय शिवमणी यांनी तेथेच 'हम्मा हम्मा' गाण्यावर ताल धरत उपस्थितांची मनं जिंकली. सध्या हा व्हिडिओ तुफान वायरल होत आहे.
पहा शिवमणींचा परफॉर्मन्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)