Shocking: पाणीपुरी बनवण्याचे पीठ पायाने मळून तयार केले; चव वाढवण्यासाठी टॉयलेट क्लीनर हार्पिक आणि युरियाचा वापर, दुकानदारांना अटक (Video)

या दोघांकडून तुरटीसारखा पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. खाद्यपदार्थांचा आंबटपणा वाढवण्यासाठी या गोष्टीचा वापर केला जात होता. त्याला वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले जाईल जेणेकरून त्याची तपासणी होईल.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

नुकतेच गाझियाबादच्या क्रॉस रिपब्लिक भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या  घरातील मोलकरीण पिठात लघवी मिसळून त्याच्या चपात्या बनवत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता झारखंडमधील गढवा येथील असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या ठिकाणी पाणीपुरी बनवण्याचे पीठ पायाने मळून तयार केले जात होते. हा व्हिडिओ निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही घटना माझियानबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, जिथे दोन दुकानदार पाणीपुरी बनवण्यासाठी पायाने पीठ मळत होते. चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींनी पोलिसांना सांगितले की, ते पाणीपुरीची चव वाढवण्यासाठी हार्पिक आणि युरिया खतांचा वापर करत होते.

याप्रकरणी अधिक माहिती देताना स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी आकाश कुमार यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. अंशू हा झाशी जिल्ह्यातील सेसा गावचा रहिवासी आहे आणि राघवेंद्र हा जालौन जिल्ह्यातील नूरपूर गावचा रहिवासी आहे. या दोघांकडून तुरटीसारखा पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. खाद्यपदार्थांचा आंबटपणा वाढवण्यासाठी या गोष्टीचा वापर केला जात होता. त्याला वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले जाईल जेणेकरून त्याची तपासणी होईल. दोन्ही तरुणांनी गढवाच्या किराणा दुकानातून पांढरे रसायन विकत घेतले, त्याचीही चौकशी केली जाणार आहे. (हेही वाचा: Shocking Viral Video: घृणास्पद कृत्य! मोलकरीण 8 वर्षे जेवणात मिसळत होती आपली लघवी, संपूर्ण कुटुंब आजारी पडल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार)

पाणीपुरी बनवण्याचे पीठ पायाने मळून तयार केले-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now