Ayodhya Ram Mandir Inauguration: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर साधू, महंत सह आमंत्रित पोहचले मंदिरात श्रीरामाच्या दर्शनाला (Watch Video)
उद्या 23 जानेवारीपासून सामान्य रामभक्तासाठी देखील हे श्रीराम जन्मभूमी मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
अयोद्धेमध्ये भगवान श्रीरामांच्या आगमनानंतर आता रामभक्तांमध्ये आनंदाचं, चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या सोहळ्याला उपस्थित साधू, महंत आणि अन्य उपस्थित देखील दर्शनाला पोहचले आहेत. यावेळी त्यांनी 'जय श्री राम' च्या घोषणा देत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. "हा नवीन भारताचा चेहरा आहे. आमचा सर्वात मोठा धर्म मानवता आहे. आमच्यासाठी राष्ट्र हे पहिले आहे," असे अयोध्या राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' समारंभात ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनी म्हटलं आहे. उद्या 23 जानेवारीपासून सामान्य रामभक्तासाठी देखील हे श्रीराम जन्मभूमी मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
पहा ट्वीट
इमामांची पहा प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)