Rs 75 Coin: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त सरकार जारी करणार 75 रुपयांचे स्मारक नाणे; जाणून घ्या वैशिष्ठ्ये

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले जाईल. मंत्रालयाने नाणे कायदा, 2011 च्या कलम 24 अंतर्गत राजपत्र अधिसूचना जारी केली.

New Parliament Building. (Photo Credits: Twitter)

येत्या 28 मे रोजी देशाला नवी संसद भवनाची इमारत मिळणार आहे. या विशेष प्रसंगी केंद्र सरकार 75 रुपयांचे विशेष स्मारक नाणे जारी करणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज जाहीर केले की, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले जाईल. मंत्रालयाने नाणे कायदा, 2011 च्या कलम 24 अंतर्गत राजपत्र अधिसूचना जारी केली.

नाण्यांचे संकलन आणि अभ्यास करणारे प्रसिद्ध नाणीशास्त्रज्ञ सुधीर लुणावत यांच्या मते, या 75 रुपयांच्या नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभाखाली 75 रुपये आणि उजवीकडे आणि डावीकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये भारत लिहिलेले असेल. नाण्याच्या दुसर्‍या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र असेल, ज्यावर हिंदीत आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले असेल. संसदेच्या चित्राच्या खाली 2023 हे वर्ष लिहिलेले असेल. सुधीर यांच्या म्हणण्यानुसार, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नाण्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे. सुधीर यांनी सांगितले की, हे नाणे भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीने बनवले आहे. या नाण्याचे एकूण वजन 35 ग्रॅम आहे, ज्यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5-5 टक्के निकेल आणि झिंक मिसळले आहे. सुधीरच्या म्हणण्यानुसार, याआधीही देशात वेगवेगळ्या प्रसंगी 75 रुपयांची स्मरणार्थ नाणी 5 वेळा जारी करण्यात आली आहेत. (हेही वाचा: भारतीय नौदलाचा आणखी एक विक्रम; INS विक्रांतवर MiG-29K चे रात्री करण्यात आले यशस्वी लँडिंग)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now