अयोध्येतील रामजन्मभूमी भागात 50 फूट उत्खननात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष (See Pic)
यामध्ये मूर्ती, स्तंभ यांचा समावेश आहे.
अयोद्धे मध्ये राम मंदिराच्या उभारणीचं काम जोरात सुरू आहे. अशामध्ये एका ठिकाणी खोदकाम सुरू असताना प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये मूर्ती, स्तंभ यांचा समावेश आहे. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट चे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडीयात त्याचे फोटोज शेअर केले आहेत. यंदाच्या मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल अशी माहिती समोर येत आहे पण अद्याप तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पहा ट्वीट