RBI Monetary Policy: व्याज दरवाढीला ब्रेक; Repo Rate 6.5% जैसे थे

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या MPC बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली आहे, म्हणजेच रेपो दर 6.50 टक्के राहील.

Shaktikanta Das (PC - PTI)

देशातील किरकोळ महागाई जानेवारीमध्ये 6.52% आणि फेब्रुवारीमध्ये 6.44% होती, जी आरबीआयच्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. असे असूनही, RBI ने  आज RBI Monetary Policy जाहीर करताना  नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या MPC बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली आहे, म्हणजेच रेपो दर 6.50 टक्के राहील. मागील काही महिन्यांपासून सातत्याने रेपो रेटही वाढत असल्याने सामान्यांचं आर्थिक गणित बिघडलं होतं.

पहा ट्वीट