Bank of Baroda: RBI ने बँक ऑफ बडोदा वरील बंदी 7 महिन्यांनी उठवली, ग्राहकांना आता 'ही' सुविधा येणार वापरता
आरबीआयने बँकेच्या ॲप 'बॉब वर्ल्ड' ॲप्लिकेशनद्वारे नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी दिली आहे. बँक आता बॉब वर्ल्ड ऍप्लिकेशनद्वारे ग्राहक जोडू शकतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अखेर 7 महिन्यांनंतर बँक ऑफ बडोदावरील बंदी उठवली आहे. वास्तविक, आरबीआयने बँकेच्या ॲपवर बंदी घातली होती आणि नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. रिझर्व्ह बँकेने 10 ऑक्टोबर 2023 रोजी BOB ला 'BOB World' या मोबाईल ॲपद्वारे नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले होते. आता आरबीआयने बँकेच्या ॲप 'बॉब वर्ल्ड' ॲप्लिकेशनद्वारे नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी दिली आहे. बँक आता बॉब वर्ल्ड ऍप्लिकेशनद्वारे ग्राहक जोडू शकतात.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)