Rajya Sabha Nomination: पी.टी. उषा, इलैयाराजा यांच्यासह चौघांना मिळाले राज्यसभेचे नामांकन; PM Narendra Modi यांनी केले अभिनंदन

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम 80 अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे.

PM Narendra Modi with PT Usha (Photo credit: Twitter)

आज 4 सेलिब्रिटींना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले. यामध्ये खेळाडू पीटी उषा, गायक इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचा समावेश आहे. या सर्वांचे नामांकन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सर्व सन्माननीय सदस्यांचे अभिनंदन केले. पीएम मोदींनी स्वतंत्र ट्विट करून चौघांचेही अभिनंदन केले आहे. दरम्यान, राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम 80 अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत 250 सभासद असून त्यातील, 12 सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement