Rajasthan Royal Wedding: राजस्थानमध्ये पार पडले शाही थाटात लग्न; पित्याने मुलीला भेट म्हणून दिले 2 किलो सोने, 100 किलो चांदी, कार, फॅक्टरी, प्लॉटसह कोट्यावधी रुपयांची एफडी (Watch)

या पित्याने आपल्या मुलीला स्त्रीधन म्हणून जवळजवळ 2 किलो सोन्याचे दागिने आणि 100 किलो चांदीचे दागिने दिले आहेत.

Rajasthan Royal Wedding

राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्या मुलीचे शाही पद्धतीने लग्न लावून दिले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. जैतरण भागातील मोहराई गावात 22 फेब्रुवारी रोजी हा लग्न सोहळा पार पडला, ज्यामध्ये वरातीच्या स्वागतासाठी शाही व्यवस्था करण्यात आली होती. या पित्याने आपल्या मुलीला स्त्रीधन म्हणून जवळजवळ 2 किलो सोन्याचे दागिने आणि 100 किलो चांदीचे दागिने दिले आहेत. यासह सर्व प्रकारचे चांदीची भांडी, फर्निचर, एसयूव्ही कार, बाईक, बंगला, बेंगळुरूमध्ये 12000 स्क्वेअर फूट फॅक्टरी, 30X40 प्लॉट, पाली हाऊसिंग बोर्डमध्ये जमीन देऊन पाठवणी केली आहे. मुलीच्या पाठवणीवेळी कोट्यावधी रुपयांच्या पैशांचा पाऊस पाडला गेला.

बेंगळुरूमध्ये प्रॉपर्टीचा व्यवसाय असणारे महेंद्रसिंग सेवाड यांची मुलगी वंशिका हिचे हे लग्न होते. वंशिकाच्या लग्नाची व्यवस्था त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थान मोहराईपासून 5 किलोमीटर अंतरावर एका ठिकाणी केली होती. याच ठिकाणी वरातीच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था होती. उद्योगपती महेंद्र सिंह यांच्या बंगळुरू येथे अनेक मालमत्ता असून ते पाईपचा व्यवसायही करतात. वंशिकाचा पती कुलदीप सिंग जगरवाल हा देखील एक व्यापारी आहे. त्याचे कुटुंब पहचाना गावाचे रहिवासी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)