Rahul Gandhi Defamation Case Verdict: 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल सुरत कोर्टात आज सुनावणी, सुनावणीसाठी राहुल गांधी सुरतला रवाना

राहुल गांधी न्यायालयात हजर राहण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत. तेथून ते सुरतला रवाना होतील.

'मोदी आडनाव' (Modi Surname) टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात दाखल  फौजदारी मानहानीच्या खटल्याचा निकाल गुजरतमधील सूरत कोर्टाकडून (Gujarat's Surat City Court ) आज सुनावणी होणार आहे.  राहुल गांधी न्यायालयात हजर राहण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत. तेथून ते सुरतला रवाना होतील. दुसरीकडे, राहुल गांधी सुरतला पोहोचण्यापूर्वी गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष (GPCC) अध्यक्ष जगदीश ठाकोर, पक्ष विधिमंडळ पक्षाचे नेते अमित चावडा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) गुजरातचे प्रभारी रघु शर्मा आणि आमदारांसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी तयारीला लागले आहेत.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement