अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध - PM Narendra Modi
देशातील अनेक जिल्ह्यांमधे 3 लाखांपेक्षा अधिक जागी 5-जी सेवा लागू होणे, ही आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रवासातील एक मोठी कामगिरी असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशातील अनेक जिल्ह्यांमधे तीन लाखांपेक्षा जास्त ठिकाणी, 5-जी सेवेची यशस्वी स्थापना होणे, ही घटना भारताच्या तंत्रज्ञान प्रवासातील मैलाचा दगड ठरली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची 5-जी व्यवस्था ठरलेल्या भारताच्या कामगिरीविषयी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“डिजिटल संपर्क व्यवस्थेत भारत पुढेच जातो आहे ! देशातील अनेक जिल्ह्यांमधे 3 लाखांपेक्षा अधिक जागी 5-जी सेवा लागू होणे, ही आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रवासातील एक मोठी कामगिरी आहे. अत्यंत जलद गतीने होत असलेली, 5-जी ची अंमलबजावणी, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवत, अनेकांच्या जीवनात परिवर्तन करण्याची आणि प्रगतीला चालना देण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करणारी आहे.”