Rozgar Mela 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 71 हजार उमेदवारांना आज मिळणार नियुक्तीपत्रं
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या पत्रकानुसार पंतप्रधान मोदी या नियुक्त्यांना संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (16 मे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे 71,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या पत्रकानुसार पंतप्रधान मोदी या नियुक्त्यांना संबोधित करतील. देशभरामध्ये आजचा रोजगार मेळा 45 ठिकाणी आयोजित केला आहे. या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या केंद्र सरकारच्या विभागांमध्ये आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांमध्ये भरती होत आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. Employment News: केंद्र सरकारच्या 78 विभागांमध्ये 9.79 लाखांहून अधिक रिक्त पदे; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)