PM Narendra Modi at Summit of Future: 'भारतासाठी एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य ही वचनबद्धता आहे'; संयुक्त राष्ट्राद्वारे पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश (Video)

आपल्या भाषणात त्यांनी जागतिक शांतता आणि विकासासाठी सामूहिक शक्ती आणि सहकार्य सर्वात महत्त्वाचे असल्याचे वर्णन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मानवतेचे यश कोणत्याही रणांगणात नसून आपल्या सामूहिक शक्तीमध्ये आहे.

PM Modi at Summit of Future | ANI

PM Narendra Modi at Summit of Future: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत 'समिट ऑफ फ्युचर'ला संबोधित केले. यावेळी त्यांनी मानवकेंद्रित दृष्टिकोन आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यावर भर दिला. आपल्या भाषणात त्यांनी जागतिक शांतता आणि विकासासाठी सामूहिक शक्ती आणि सहकार्य सर्वात महत्त्वाचे असल्याचे वर्णन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मानवतेचे यश कोणत्याही रणांगणात नसून आपल्या सामूहिक शक्तीमध्ये आहे. ते म्हणाले, जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. सुधारणा ही प्रासंगिकतेची गुरुकिल्ली आहे. 'समिट ऑफ द फ्युचर'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भारतासाठी 'एक पृथ्वी', 'एक कुटुंब' आणि 'एक भविष्य' ही एक वचनबद्धता आहे. ही बांधिलकी आमच्या 'वन अर्थ', 'वन हेल्थ, ‘वन सन’, 'वन ग्रिड...' यांसारख्या उपक्रमांमध्येही दिसून येते. प्रत्येक धोरणात्मक निर्णयात माणुसकी केंद्रस्थानी ठेवली पाहिजे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मानवतावादी दृष्टिकोनाचा अवलंब करूनच आपण शाश्वत आणि समृद्ध भविष्याकडे वाटचाल करू शकतो, असे ते म्हणाले. (हेही वाचा: PM Modi Statue With Lab-Grown Diamonds: अमेरिकेतील भारतीय वंशाच्या ज्वेलर्सनी बनवली प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांपासून पीएम मोदींची मूर्ती, पहा व्हिडिओ)

संयुक्त राष्ट्राद्वारे पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now