PM Modi speaks Marathi in Poland: दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलिश निर्वासितांसाठी महाराष्ट्रातील वळिवडे गाव ठरलं होतं आशेचा किरण; त्यामागील मानवतावादी विचारांचा पीएम मोदी यांच्याकडून पोलंड मध्ये मराठीत उल्लेख (Watch Video)
सोव्हिएत मधून सुटलेल्या स्त्रिया, मुले आणि वृद्धांसह सुमारे 6,000 पोलिश निर्वासितांना त्यावेळी कोल्हापूरच्या वळिवडे मध्ये राजसंस्थान कडून आश्रय देण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या दौर्यावर आहे. या दौर्या दरम्यान त्यांनी राजधानी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला भेट दिली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं कौतुक करताना त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलिश निर्वासितांसाठी आशेचा किरण ठरलेल्या महाराष्ट्रातील वळिवडे गावाचा उल्लेख केला. त्यामागील मानवतावादी विचारांचा पीएम मोदी यांनी पोलंड मध्ये मराठीत उल्लेख करत उपस्थित मराठीजनांची मनं जिंकली. वॉर्सा येथील स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी X वर मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पोलंड मध्ये मोदी मराठीत बोलतात तेव्हा...
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement