Parliament Security Breach: बनावट आधारकार्ड दाखवून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ जणांना अटक, एफआयआर दाखल

बनावट आधार कार्ड दाखवून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन मजुरांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर ओळखपत्रे तपासत असताना तीन संशयितांना ताब्यात घेतले. कासिम, मोनिस आणि शोएब अशी त्यांची नावे आहेत. या तिन्ही आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे, फसवणूक अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

New Parliament Building. (Photo Credits: Twitter)

Parliament Security Breach: बनावट आधार कार्ड दाखवून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन मजुरांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर ओळखपत्रे तपासत असताना तीन संशयितांना ताब्यात घेतले. कासिम, मोनिस आणि शोएब अशी त्यांची नावे आहेत. या तिन्ही आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे, फसवणूक अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. अधिका-यांनी सांगितले की, या तिन्ही मजुरांना 'डीव्ही प्रोजेक्ट्स लिमिटेड' कंपनीने संसद भवन संकुलात खासदार विश्रामगृहाच्या बांधकामासाठी कामावर ठेवले होते. मात्र, संसदेच्या सुरक्षेत कुचराई होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकदा संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचे प्रयत्न झाले आहेत.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement