200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली; भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी

गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस, गुजरात यांनी केलेली ही पाचवी संयुक्त कारवाई आहे.

अंमली पदार्थ घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली

भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATC) संयुक्तपणे कारवाई करत, सुमारे 200 कोटी रुपये किमतीचे सुमारे 40 किलोग्रॅम अंमली पदार्थ नेणारी, सहा जण असलेली  एक पाकिस्तानी बोट भारतीय जलहद्दीतून  ताब्यात घेतली. 13-14 सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्री भारतीय तटरक्षक दलाने गुजरात एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा (आयएमबीएल) क्षेत्राच्या जवळच्या भागात गस्त घालण्यासाठी दोन वेगवान आंतररोधी  श्रेणीतील- C-408 आणि C-454– जहाजांना तैनात केले होते. या जहाजांना आयएमबीएलच्या आत पाच नॉटिकल मैल आणि जखाऊपासून 40 नॉटिकल मैल भारतीय जलहद्दीत एक पाकिस्तानी बोट संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. खवळलेल्या समुद्राचा सामना करत तटरक्षक दलाच्या  जहाजांनी बोट अडवली आणि तिला ताब्यात घेतले.

पुढील संयुक्त तपासासाठी बोट जखाऊ येथे आणण्यात येत आहे. गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस, गुजरात यांनी केलेली ही पाचवी संयुक्त कारवाई आहे. किनाऱ्यावरचे सुरक्षा जाळे मजबूत असून त्याच्याशी संबधित यंत्रणांमध्ये असलेल्या प्रभावी समन्वयाचे महत्त्व या कारवाईमुळे अधोरेखित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif