MP Toddler Rescue Operation: मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील कजारी बरखेडा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या 18 महिन्यांच्या मुलीला बाहेर काढण्यात यश (Watch Video)

बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलीला वेंटिलेशन आणि ऑक्सिजनचा पुरवठा करून स्थानिक लोक मदत करत आहेत.

MP | Twitter

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील कजारी बरखेडा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या 18 महिन्यांच्या मुलीला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ही चिमुरडी 20 फूट खोल बोअरवेल मध्ये पडली आहे. SDRF चं पथक तिच्यापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करत आहे. खेळता खेळता ती या बोअरवेल मध्ये पडली आहे. दरम्यान, बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलीला वेंटिलेशन आणि ऑक्सिजनचा पुरवठा करून स्थानिक लोक मदत करत आहेत. तिला बाहेर काढण्यात आले असून सध्या हॉस्पितलमध्ये नेले जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now