Odisha Horror: जाजपूर जिल्ह्यात बिरुपा नदीत मगरीने महिलेला जिवंत खाल्ले; समोर आला धक्कादायक व्हिडिओ (Watch Video)

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Crocodile

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवाशांनी बुधवारी बिरुपा नदीत एका मगरीने एका महिलेला जिवंत खाऊन टाकल्याचे भयानक दृश्य पाहिले. जिल्ह्यातील बारी ब्लॉकमधील पालतपूर गावात एक 35 वर्षीय महिला नदीत कपडे धुत असताना महिलेला मगरीने नदीच्या खोल पाण्यात ओढत नेले. महिलेने मगरीच्या तावडीतून स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. नदीकाठावर उपस्थित असलेल्या स्थानिकांनी मगर महिलेला ओढून नेत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओडिशात तीन महिन्यांत मगरीने ठार मारण्याची ही पाचवी घटना आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)