Odisha Accident: ओडिशातील मलकानगिरी येथे ट्रक उलटल्याने पाच कामगारांचा मृत्यू

पोलीस आणि स्थानिक लोकांनी सिमेंटच्या पोत्याखाली दबलेल्या मृत कामगारांना बाहेर काढले. जखमी कामगारांना जवळच्या जोडंबा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले

Odisha Accident: ओडिशातील मलकानगिरी येथे ट्रक उलटल्याने पाच कामगारांचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात शनिवारी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाल्याने पाच कामगार ठार तर सात जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. ट्रक 12 कामगारांसह चित्रकोंडा येथून जोडंबाकडे जात असताना स्वाभिमान आंचल भागातील हंतालागुडा घाटात हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिक लोकांनी सिमेंटच्या पोत्याखाली दबलेल्या मृत कामगारांना बाहेर काढले. जखमी कामगारांना जवळच्या जोडंबा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2023 04:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).