Namaz Break in Rajya Sabha: आता राज्यसभेत नमाजासाठी 30 मिनिटांचा ब्रेक नाही, धनखड यांनी बदलला नियम

राज्यसभेत हा अतिरिक्त अर्धा तास नमाजासाठी देण्यात आला होता,

Jagdeep Dhankhar (Photo Credit - X)

संसदेच्या अधिवेशनादरम्यान दर शुक्रवारी नमाजासाठी अर्धा तासाचा ब्रेक राज्यसभेत रद्द करण्यात आला आहे. या व्यवस्थेची माहिती राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली आहे. त्यासंबंधीच्या नियमात बदल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सध्या, राज्यसभेत लंच ब्रेक दर शुक्रवारी दुपारी 1:00 ते 2:30 पर्यंत असतो, तर लोकसभेत लंच ब्रेक दुपारी 1:00 ते 2:00 पर्यंत असतो. राज्यसभेत हा अतिरिक्त अर्धा तास नमाजासाठी देण्यात आला होता, तो आता नियमात बदल करून सभापतींनी रद्द केला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)