2 Election Commissioners to ECI Fake Notification Alert: भारताच्या निवडणूक आयुक्त पदी दोघांच्या निवडीचे वायरल परिपत्रक खोटे; जाणून घ्या PIB चा खुलासा
अरूण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर भारताचं मुख्य निवडणूक आयुक्त पद रिक्त आहे.
देशात लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर अरूण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भारताच्या निवडणूक आयुक्त पदी नव्याने 2 निवृत्त IAS अधिकार्यांची निवड झाल्याचं एक खोटं नोटिफिकेशन वायरल होत आहे. यामध्ये तातडीने 13 मार्च पासून राजेश गुप्ता आणि प्रियांश शर्मा पदभार सांभाळतील असा दावा आहे मात्र PIB ने खुलासा करत हे परिपत्रक खोटं असल्याचं सांगत अद्याप निवडणूक आयुक्त पदी निवडीबाबत निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)