No Bird Flu Case In Bengal: बंगालमध्ये बर्ड फ्लूचा एकही रुग्ण नाही, परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी टीम गठीत
पश्चिम बंगाल मध्ये सध्या एक ही बर्ड फ्लूचा रुग्ण सापडला नाही. आणि त्यामुळे राज्यात मूल्यांकनाचे मूल्यांकन करन्यासाठी एक टीम त्यार केली गेली आहे. असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज सांगितले आहेत. राज्यात मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथ सुमारे 29,000 पक्ष्यांची तपासणी यापूर्वीच केली आहे, आंसे ते म्हणाले.
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सध्या एकही बर्ड फ्लूचा रुग्ण सापडला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात या आजाराचे मूल्यांकन करण्यासाठी एक टीम तयार केली गेली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. राज्यात मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथ सुमारे 29,000 पक्ष्यांची तपासणी यापूर्वीच केली आहे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील एका चार वर्षांच्या मुलीला जानेवारीमध्ये हा आजार झाला होता, मात्र उपचारनंतर ते बरा झाला, असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. हेही वाचा: H9N2 Bird Flu in India: पश्चिम बंगाल मध्ये 4 वर्षीय चिमुकलीला H9N2 Bird Flu; भारतातील दुसरा रूग्ण
आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दोन प्रतिनिधींचा समावेश असलेले एक पथक राज्यात दुसऱ्यांदा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. अधिकाऱ्याच्यामते राज्यात सध्या एकही बर्ड फ्लूचे प्रकरण नसून, मालदा जिल्ह्यातील ठीक झालेल्या रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. या मुलाच्या घरी पोल्ट्री फार्म होता व कदाचित त्यामुळे त्याला H9N2 विषाणूची लागण झाली असू शकते. या मुलाच्या कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी केली असून, कोणालाही विषाणूची बाधा झाली नसल्याचे समोर आले. H9N2 बर्ड फ्लू विषाणू हा एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचा एक उपप्रकार आहे, जो संसर्गजन्य प्राण्यांच्या थेट संपर्कातून पसरतो.
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)