Acid Attack in Aligarh: क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांचा वृद्ध जोडप्यावर अॅसिड फेकला; दोघेही गंभीररित्या भाजले (Video)
बाजारात जात असताना एका वृद्ध जोडप्यावर त्यांच्या शेजाऱ्यांनी अॅसिड हल्ला केला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Acid Attack in Aligarh: उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये (Aligarh) 12 मार्च रोजी शेजऱ्यांनी एका वृद्ध जोडप्यावर अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याचे समोर आले आहे. बाजारात जात असताना त्यांच्यात काही वाद झाले. त्यात अब्दुल सत्तार आणि त्यांची पत्नी मुन्नी बेगम गंभीर रित्या भाजले गेले. फैज शोएब, शादाब, शहजाद अशी हल्ला केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या मुलाला भेटायला जात असताना हे जोडपे गंभीर भाजले आणि काही मार्गस्थही जखमी झाले. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आणि पीडितांना मलखान सिंग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वादातून शेजाऱ्यांचा वृद्ध जोडप्यावर अॅसिड फेकला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)