Neha Biswal Molested in Bengaluru: रात्री घरी परतत असताना व्लॉगिंग करत होती मुलगी; अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने केला विनयभंग, व्हिडीओ व्हायरल (Video)

नेहाने सांगितले की मुलगा लहान असल्याने तिने एफआयआर दाखल केला नाही, परंतु बेंगळुरू पोलिसांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आणि मुलाचा शोध सुरु केला आहे.

Neha Biswal molested in Bengaluru (Photo Credit: X/@karnatakaportf)

Neha Biswal Molested in Bengaluru: बेंगळुरूमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका मुलीने आरोप केला आहे की ती, बीटीएम लेआउट परिसरात व्लॉगिंग करत असताना एका 10 वर्षांच्या मुलाने तिचा विनयभंग केला. ही घटना गेल्या मंगळवारी घडली. नेहा बिस्वाल असे पिडीत मुलीचे नाव असून, ती कामावरून घरी परतत होती आणि व्हिडिओ शूट करत होती, तेव्हा समोरून सायकलवरून आलेल्या एका 10 मुलाने तिचा विनयभंग केला. नेहाने स्वतः एका व्हिडीओद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तिने व्हिडिओमध्ये सांगितले की, ती घरी परत येत असताना व्हिडीओ शूट करत होती, त्यावेळी सायकलवरून जाणाऱ्या एका 10 वर्षांच्या मुलाने तिला 'हाय' म्हटले, त्यानंतर तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि तेथून पळू लागला. मात्र त्याचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर नेहा आणि इतर लोकांनी मुलाला चांगलाच चोप दिला.

नेहाने इंस्टाग्रामवर रडत रडत ही घटना कथन केली आहे. नेहाने सांगितले की मुलगा लहान असल्याने तिने एफआयआर दाखल केला नाही, परंतु बेंगळुरू पोलिसांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आणि मुलाचा शोध सुरु केला आहे. (हेही वाचा: Bengaluru Shocker: दिवाळी पार्टीत स्विमिंग पूलमध्ये मुलींचे चित्रीकरण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न बेतला जीवावर; तरूणाला बेदम मारहाण)

Neha Biswal Molested in Bengaluru:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)