NDA, INDIA Alliances यांच्या आज पुढील रणनीतींसाठी बैठका; Nitish Kumar आणि Tejashwi Yadav एकाच विमानाने दिल्लीला रवाना ( Watch Video)

पटना वरून दिल्लीला जाताना नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र प्रवास केल्याचं पहायला मिळालं आहे.

Nitish Kumar आणि Tejashwi Yadav | X @

लोकसभा निवडणूक निकालांनंतर आता सत्तेमध्ये कोण बसणार याची उत्सुकता वाढली आहे. एकीकडे नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान बनण्याच्या तयारीत असताना इंडिया आघाडी भाजपामधील नाराज लोकांना आपल्यामध्ये घेत सरकार स्थापनेचा विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत एनडीए आणि इंडिया अलायंसची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी पटना वरून जाताना नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र प्रवास केल्याचं पहायला मिळालं आहे. एकेकाळी एकत्र असलेल्या या दोन्ही नेत्यांची पुन्हा 'मनं जुळणार' का? याची चर्चा आता रंगायला लागली आहे. यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य दिले.   INDIA Bloc Meeting: सत्ता स्थापनेसाठी दावा? इंडिया आघाडी सक्रीय; दिल्लीमध्ये खलबतं, शरद पवार, सुप्रिया सुळे राजधानीकडे रवाना.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement