Narendra Modi Mentioned as 'Prime Minister of Bharat': नरेंद्र मोदी यांचा भारताचे पंतप्रधान असा उल्लेख, फोटो व्हायरल; काँग्रेसकडून प्रतिक्रिया

इंडोनेशियातील आगामी 20th ASEAN-India summit निमित्त पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या अधिकृत नोटमध्ये त्यांचा उल्लेख 'भारताचे पंतप्रधान' असा करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या G20 आमंत्रणांमध्येही "इंडीया" ऐवजी "भारत" असा बदल झाला आहे. या बदलाची नोंद घेत काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

इंडोनेशियातील आगामी 20th ASEAN-India summit निमित्त पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या अधिकृत नोटमध्ये त्यांचा उल्लेख 'भारताचे पंतप्रधान' असा करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या G20 आमंत्रणांमध्येही "इंडीया" ऐवजी "भारत" असा बदल झाला आहे. या बदलाची नोंद घेत काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे कम्युनिकेशन्सचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेत सरकार गोंधळात पडले आहे. "हे सर्व नाटक फक्त विरोधी पक्ष एकत्र आल्याने सुरु आहे. केवळ त्यामुळेच ते स्वतःला भारत म्हणवून घेत आहेत," असे रमेश यांनी X वर लिहिले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now