Muslim Girls Are Forced Into Marriage With Hindus: 'मुस्लीम मुलींचे अपहरण करून त्यांचे हिंदूंशी लावले जात आहे जबरदस्तीने लग्न'; केरळचे मुस्लिम नेते Nasser Faizi यांचा आरोप
फैजी म्हणाले, केरळमधील CPM, DYFI आणि SFI असे पक्ष आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यासाठी मुस्लिम मुलींचे अपहरण करून त्यांना हिंदूंसोबत जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले जात आहे.
Muslim Girls Are Forced Into Marriage With Hindus: केरळमधील समस्थ केरळ जेम-इय्यातुल उलामा (Samastha Kerala Jem-iyyathul Ulama) ची युवा शाखा असलेल्या सुन्नी युवाजन कार्यक्रम (SYS) चे सचिव नासेर फैजी यांनी राज्यातील आंतरधर्मीय विवाहाबद्दल मोठा आरोप केला आहे. फैजी म्हणाले, केरळमधील CPM, DYFI आणि SFI असे पक्ष आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यासाठी मुस्लिम मुलींचे अपहरण करून त्यांना हिंदूंसोबत जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले जात आहे. हिंदू किंवा मुस्लिमांशी लग्न करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे, असे काहींना वाटते. याविरोधात महाल समित्यांनी सतर्क राहावे, अशी मागणीही नसर फैजी यांनी केली. कोझिकोडमधील कोइलांडी येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना फैझी यांनी हे भाष्य केले. नासेर फैजी पुढे म्हणाले की, आपल्याच समाजात विवाह करण्याची प्रथा भारतात पाळली जात आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी महल समित्यांनी म्हणजेच मुस्लिम धर्मीय संघटनांनी तयार असले पाहिजे. (हेही वाचा: Cross-Border Love Story: प्रियकरासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानी तरुणी भारतात दाखल, पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जानेवारीमध्ये उडवणार लग्नाचा बार)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)