मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी: 7 तलावांमधील पाणीसाठा 57.75 टक्क्यांवर, 3.70 टक्के वाढ.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत तलावांमधील साठा ३.७० टक्क्यांनी वाढून एक एकूण ५७.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Lake प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

सोमवार, २० जुलै २०२६ सकाळी ६ ते मंगळवार, २१ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासांच्या कालावधीत मुंबई आणि परिसर तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. या २४ तासांत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांच्या एकूण साठ्यात ३.७० टक्क्यांची नोंदवण्याजोगी वाढ झाली आहे. या पावसामुळे तलावांमधील एकूण उपयुक्त जलसाठा आता ५७.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात हलका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement