Muhurat Trading 2023: दिवाळीत संध्याकाळी काही कालावधीसाठी उघडणार शेअर बाजार; जाणून घ्या ट्रेडिंगचा मुहूर्त
दिवाळीच्या काळात पूजेपासून व्यापार, गुंतवणूक, नवीन सुरुवात, गृहप्रवेश अशा अनेक गोष्टींसाठी शुभ मुहूर्त असतात. भारतात दिवाळीच्या दिवशीही काही काळासाठी शेअर बाजार उघडण्याची जुनी परंपरा आहे.
ऐश्वर्य आणि समृद्धीच्या दृष्टीने दिवाळी हा सण सर्वात शुभ मानला जातो. दिवाळीच्या काळात पूजेपासून व्यापार, गुंतवणूक, नवीन सुरुवात, गृहप्रवेश अशा अनेक गोष्टींसाठी शुभ मुहूर्त असतात. भारतात दिवाळीच्या दिवशीही काही काळासाठी शेअर बाजार उघडण्याची जुनी परंपरा आहे. या वर्षी, रविवारी 12 नोव्हेंबर 2023 रोजी, दिवाळीच्या मुहूर्तावर (लक्ष्मी पूजन) बाजार संध्याकाळी 06:00 ते 07:15 पर्यंत खुला राहील. प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी 06:00 ते 06:15 पर्यंत खुले असेल. गुंतवणूकदारांमध्ये केवळ नफा कमावण्यासाठीच नाही तर, या खास प्रसंगी ट्रेडिंग करण्यातही वेगळाच उत्साह असतो. मुहूर्ताच्या विशेष प्रसंगी शेअर बाजारात फक्त एक तास व्यवहार होतो. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मुहूर्ताच्या व्यवहारादरम्यान बाजारात गुंतवणूक करतात. अशा परिस्थितीत, तुम्ही दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या पोर्टफोलिओची शुभ सुरुवात करू शकता.