CISF Jawan Commits Suicide: दिल्ली मेट्रोत तैनात CISF जवानाने स्वतःवर झाडली गोळी

हा जवान 2022 पासून दिल्ली मेट्रोमध्ये तैनात होता. या जवानाने त्याच्या सर्व्हिस राफेलने स्वतःवर गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झालाय. सहारे किशोर असे मृत जवानाचे नाव असून तो महाराष्ट्रातील गडचिरोली येथील रहिवासी आहे.

दिल्ली मेट्रो स्थानकावर एका CISF जवानाने स्वतःवर गोळी झाडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना पश्चिम विहार मेट्रो स्थानकावर घडलीय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक सीआयएसएफ जवान कर्तव्यावर बसलेला दिसत आहे. तो त्याची रायफल त्याच्या कपाळावर लावतो आणि ट्रिगर खेचत गोळी स्वतःवर गोळी झाडतो. यानंतर एक शिपाई तिथे येतो आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावतो. यानंतर व्हिडिओमध्ये गोंधळ दिसून येतो.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now