Madhya Pradesh: कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एक वाईट बातमी; चित्त्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू, समोर आले 'हे' कारण

पीसीसीएफ जेएस चौहान यांनी सांगितले की, कुनो नॅशनल पार्कमध्ये एका बछड्याच्या मृत्यूनंतर, इतर 3 बछड्यांची प्रकृतीही चांगली दिसत नव्हती,

Cheetah Representative image (File Image)

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी दोन चित्त्याच्या बछड्यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी मादी चित्ता ज्वालाच्या 2 बछड्यांणा जीव गमवावा लागला. याआधी मंगळवारी एका बछड्याचा मृत्यू झाला होता. चित्ता ज्वालाने 27 मार्च रोजी चार बछड्यांना जन्म दिला होता. आता यापैकी फक्त एक बछडा उरला आहे. कुनो येथे दोन महिन्यांत आतापर्यंत सहा चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. पीसीसीएफ जेएस चौहान यांनी सांगितले की, कुनो नॅशनल पार्कमध्ये एका बछड्याच्या मृत्यूनंतर, इतर 3 बछड्यांची प्रकृतीही चांगली दिसत नव्हती, ही बाब लक्षात घेऊन तिन्ही बछड्यांना कुनो वन्यजीव डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. उच्च तापमान आणि उष्माघातामुळे त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोघांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाची प्रकृती अजूनही गंभीर आहे. (हेही वाचा: इंडिगोच्या विमानावर पक्ष्यांची धडक; मंगळुरूहून दुबईला जाणारे 160 प्रवासी थोडक्यात बचावले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif