Madhya Pradesh: महिलेला 8-9 जणांकडून बेदम मारहाण, मध्यप्रदेश राज्यातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल

मध्य प्रदेश राज्यातील एका घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका महिलेला तिच्या सासरकडील लोक बेदम मरहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जवळपास 8 ते 9 जण महिलेला मारहाण करताना दिसत आहेत

मध्य प्रदेश राज्यातील एका घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका महिलेला तिच्या सासरकडील लोक बेदम मरहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जवळपास 8 ते 9 जण महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. या महिलेने भूतकाळात पतीला मारहाण करून त्याचा पाय मोडल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मालती कुशवाह असे पीडित महिलेचे नाव असून ती सिकंदर कंपू येथील रहिवासी आहे. आरोपींमध्ये सासरच्या महिला आणि पुरुष दोन्ही सदस्यांचा समावेश होता. पीडितेने पती मतदीनसह अर्धा डझन सासरच्या मंडळींवर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंविरुद्ध गिरवई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement