School Van Accident in Lucknow: स्कूल व्हॅनची ऑटो-रिक्षाला धडक, 17 विद्यार्थी जखमी; हात, चेहऱ्याला दुखापत, उपचारासाठी रुग्णालयत दाखल (Watch Videos)
लखनऊमधील आलम बाग येथे स्कूल व्हॅनची ऑटो-रिक्षाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 17 विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातात स्कूल व्हॅन पलटली. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
School Van Accident in Lucknow: लखनऊमधील (Lucknow) एका दुःखद घटनेत आलम बाग सीपीएच रेल्वे कॉलनी सेतू कर्मशाळा वळणावर स्कूल व्हॅनची ऑटो-रिक्षाला धडक झाली. यात चालकाचा व्हॅनवरील ताबा सुटून ती विद्याक्थ्यांसह उलटली(School Van Acciden), त्यात 17 मुले जखमी झाली. फतेहली तालाब गार्डनजवळ इंदूर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. सर्व जखमी मुलांना तातडीने इंदूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आलम बाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एडीसीपी ईस्टच्या म्हणण्यानुसार, शाळेतील मुले सेंट तेरेसा, सीएमएस आणि लखनऊ पब्लिक स्कूलमधील होती. (Firing on School Bus in Amroha: अमरोहा मध्ये स्कूल बस वर गोळीबार; चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला)
स्कूल व्हॅनची ऑटो-रिक्षाला धडक, 17 विद्यार्थी जखमी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)