Lift Collapses in Noida: नोएडाच्या सेक्टर 137 मधील सोसायटीमध्ये लिफ्ट कोसळली; वृद्ध महिलेचा मृत्यू

लिफ्ट उघडण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

इमारत

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये लिफ्ट बिघडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता गुरुवारी इथे एक मोठी दुर्घटना घडली. नोएडा सेक्टर-१३७ च्या पारस टिएरा सोसायटीमध्ये लिफ्ट तुटल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार सोसायटीतील लोकांना समजताच सर्वजण जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला. माहितीनुसार, पारस टिएरा हाउसिंग सोसायटीच्या टॉवर क्रमांक 24 च्या आठव्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 803 मध्ये 70 वर्षीय सुशीला देवी आपला मुलगा आणि सुनेसोबत राहतात. गुरुवारी संध्याकाळी काही कामानिमित्त त्या खाली जात होत्या. त्या लिफ्टमध्ये चढताच अचानक लिफ्टची वायर तुटली. त्यामुळे त्या लिफ्टमध्येच अडकून राहिल्या. लिफ्ट मधल्या मजल्यावर अडकली. माहिती मिळताच देखभाल विभागाचे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न सुरू केला. लिफ्ट उघडण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. घाईघाईत उपस्थित लोकांनी महिलेला जवळच्या फेलिक्स रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी वृद्ध महिलेला मृत घोषित केले. (हेही वाचा: फिरोजाबादमध्ये पोलीस कर्मचारी दिनेश मिश्रा यांच्यावर गुंडांनी झाडल्या गोळ्या; उपचारादरम्यान मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)