Scary Video: बिबट्याचा भिंतीवरून उडी मारून वन वाहनावर प्राणघातक हल्ला; पहा धक्कादायक व्हिडीओ
बिबट्याने क्वार्टरच्या सीमा भिंतीवरून उडी मारून खासगी वाहनावर हल्ला केला. कारचे विंडशील्ड बंद असल्याने एक मोठा अपघात होता होता टळला.
एका बिबट्याने वन रक्षक विभागाच्या गाडीवर हल्ला केल्याची एक धक्कादायक घटना आसाममध्ये समोर आली आहे. सुरुवातीला बिबट्याने एक महिला आणि तिच्या दोन मुलींवर हल्ला केला. या सर्वांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी काही वन कर्मचारी पोहोचल्यावर बिबट्याने त्यांच्या वन वाहनावर उडी मारून वनरक्षकावर हल्ला करण्यास सुरुवात केली. यानंतर रक्षकांनी बिबट्याला घाबरवण्यासाठी सात राऊंड फायर केले. या गोंधळात बिबट्या पळून गेला आणि जोरहाट जिल्ह्यातील सोटाई येथील रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या क्वार्टर कॉरिडॉरमध्ये विश्रांतीसाठी गेला.
त्यानंतर बिबट्याने क्वार्टरच्या सीमा भिंतीवरून उडी मारून खासगी वाहनावर हल्ला केला. कारचे विंडशील्ड बंद असल्याने एक मोठा अपघात होता होता टळला. त्यानंतर बिबट्या जंगलात पळून गेला. अजूनही या बिबट्याचा शोध सुरू आहे. यातील जखमी वनपालाला जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट शेजारील गिबन राखीव जंगलातून बिबट्या आल्याचा संशय आहे.
When a leopard jumped on a moving car! Scary!!!
— Prashant Kumar (@scribe_prashant) December 26, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2022 12:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

